Posts

 उप-२७. 🌻 तुकाराम महाराज म्हणतात हे नरा, हे मनुष्या आता तरी तू श्री हरिच्या रंगात रंगून जा, त्याच्याशी समरस हो...  म्हणजे तुला जर येथे कोणाच्या रंगात मिसळायचेच असेल, कोणाशी कायावाचामने एकरूप व्हायचेच असेल तर तू श्री हरिच्या रंगात मिसळ, त्याच्याशीच एकरूप हो, परंतु ह्या संसाराला व्यर्थ भुलू नकोस...  ते म्हणतात हा संसार सर्वथा खोटा आहे हे ठाऊक असतानाही तू पतंगाप्रमाणे येथील नाशिवंत फुलांच्या रंगात का मिसळतो आहेस? ह्या मायारूपी संसाराला का भुलतो आहेस?...  ते म्हणतात हे शरीर, हा देह जाणारा असून तो तुला कधीही दगा देऊन जाऊ शकतो, कधीही तुझी साथ सोडू शकतो, त्यामुळे त्याच्या जोरावर तू सतत ज्या वेगाने अभिलाषा धरतो आहेस ते करणे सोडून दे... कारण त्या बळावर तू येथे जे काही जोडत आहेस ते देखील सर्व नाशिवंत असून नाश पावणारे आहे, तुझा हा जो काही परिवार आहे, द्रव्य-दारा, धनसंपत्ती आहे, तुझी बायकापोरे आहेत हे सर्व देखील क्षणभंगुर असून केव्हाना केव्हा जाणारे आहे, त्यामुळे यापुढे तरी व्यर्थ त्यावर विसंबून राहून नकोस... तुकोबाराय शेवटी म्हणतात हे मनुष्या एक गोष्ट लक्षात घे, आपण जिवंत असताना जो कोणी आपला खऱ्
 उप-२६.🌻 तुकाराम महाराज म्हणतात हे नरा, हे मनुष्या कित्येक जन्मां अंती तू आता मानव योनीत जन्मला आहेस, कोण जाणे किती योनीतुन फिरून आल्यावर तुला हा नरदेंह लाभला आहे... त्यामुळे यापुढे एक क्षणही वाया न दवडता तू देवाशी आता संधान बांध आणि शक्य तितक्या लवकर त्याला स्वतःचा सखा करून घे, किंबहुना त्याला तुझा सोयराच करून घेऊन मिळालेल्या या संधीचे तू आता सोने करावेस अशी माझी तुला विनंती आहे... किंबहुना ह्या जन्मात तरी तू तुझा खरा स्वार्थ साधून घे आणि तो म्हणजे स्वहिताचा स्वार्थ आणि अनर्थ घडवून आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तू संपूर्ण त्याग कर किंबहुना त्याच्याकडे पाठच फिरव...  तसेच यापुढे तरी  भ्रमाची, कल्पनेची वाट सोडून देऊन तू सरळ आणि नीट असलेला आणि तुझ्या हिताकडे घेऊन जाणारा पंढरीचा मार्ग धर...  आणि तेथे जाऊन विटेवर उभे असलेले श्री हरिचे गोजिरे रूप पहा आणि त्याद्वारे खऱ्या अर्थाने सर्व सुख पदरी पाडून घे...  तुकोबाराय शेवटी म्हणतात तुम्ही जर आम्हांला विचाराल तर स्वतःचे दोन्ही चरण जोडून विटेवर नीट आणि व्यवस्थितपणे उभा असलेला श्री हरि विठ्ठल म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा कंदच आहे आणि त्याचा नामघोष करणे